![]() |
Online Registration On E-Shram Portal |
ई-श्रम कार्ड योजनेचा ऑनलाईन खालील पर्यायाचा अवलंब करावा.
ई-श्रम कार्ड संबंधित माहिती मिळविण्यासाठी भारत सरकारने अधिकृत वेबसाइटची निर्मिती केली आहे. नोंदणी, लेबर कार्ड, ऍडमिन लॉगिन, अनुदान जारी करणे किंवा इतर सर्व प्रक्रिया तुम्हाला ई-श्रमच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उपलब्ध करता येतील.या योजनेची अधिकृत वेबसाइट https://eshram.gov.in हि आहे.
ई-श्रम
पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया – Registration Process on E-shram Portal
- सर्वप्रथम तुम्हाला ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. जी खालीलप्रमाणे आहे
- https://eshram.gov.in आहे.
- अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक मुख्यपृष्ठ उघडेल.
- पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला ‘ई-श्रमवर नोंदणी करा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- E-Shram वर नोंदणी करा’ या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर स्क्रीनवर दुसरे पेज उघडेल
- आता तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर, EPFO आणि ESIC सदस्य स्थिती आणि कॅप्चा कोड या पेजवर टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला सेंड ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी आला आहे, तोच ओटीपी तुम्हाला बॉक्समध्ये टाकावा लागेल.
- आलेली सर्व माहिती काळजी पूर्वक भरावी व शेवटी, नोंदणी पर्यायावर क्लिक करा.यासह तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली जाईल.
ई-श्रम
योजनेचे मदत केंद्र
ई-लेबरशी संबंधित
सर्व समस्यांचे निराकरण करण्याची सुविधा सुद्धा भारत सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
तुम्हाला ई-श्रमाशी संबंधित काही समस्या असल्यास किंवा तुम्हाला अनुदानासाठी अर्ज करायचा
असल्यास तुम्ही या पोर्टलच्या हेल्पडेस्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. हेल्पडेस्क
क्रमांक खालीलप्रमाणे आहे
हेल्पडेस्क क्रमांक-
14434
तुम्हाला आणखी
काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण असल्यास ईमेलद्वारे किंवा फोन नंबरद्वारे
संपर्क साधू शकता. ईमेल, फोन नंबर किंवा पत्त्याशी संबंधित काही माहिती खालीलप्रमाणे
आहे-
ईमेल आयडी- [email protected]
पत्ता- श्रम आणि
रोजगार मंत्रालय, सरकार. ऑफ इंडिया, जैसलमेर हाऊस, मानसिंग रोड, नवी दिल्ली-110011, भारत
फोन नंबर: ०११-२३३८९९२८
ई-श्रमिक कार्डविषयी नेहमी विचारले जाणारे
प्रश्न– FAQ
प्रश्न
क्र.१. ई-श्रम कार्ड नाव नोंदणीची अंतिम मुदत काय आहे?
उत्तर : ई-श्रम कार्ड नाव नोंदणीची
कुठलीही अंतिम मुदत नाहीये.आपण कधीही ई श्रमिक योजनेच्या आँफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपली
नाव नोंदणी करू शकतो.
प्रश्न
क्र.२. ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी आधी काही चार्ज,फी भरावी लागते का?
उत्तर : ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी
आपणास कुठलीही चार्ज,फी भरावी लागत नाही.
प्रश्न
क्र.३. ई-श्रम कार्डसाठी विदयार्थी देखील अर्ज करू शकतात का?
उत्तर : नाही
ई-श्रम कार्डसाठी मजुरी काम करत नसलेले,कामगार नसलेले आणि फक्त
शिक्षण घेत असलेले बिन कमाऊ विदयार्थी अर्ज करू शकत नसतात.
प्रश्न
क्र.४. ई-श्रम कार्डदवारे पेंशन कसे प्राप्त करायचे?
उत्तर : ई-श्रम कार्डदवारे पेंशन
प्राप्त करण्यासाठी आपणास पंतप्रधान श्रम योगी योजनेत नाव नोंदणी करावी लागते आणि इथे
नाव नोंदणी करायला आपल्याकडे ई श्रमिक कार्ड असावे लागते.कारण आपल्याकडे ई श्रमिक कार्ड
असेल तर यादवारे आपण Pmsym योजनेसाठी अर्ज करू शकतो.
प्रश्न
क्र.५. ई-श्रम कार्ड योजनेविषयी काही शंका असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण काय करावे?
उत्तर : ई-श्रम कार्ड योजनेविषयी
काही शंका असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण 14434 ह्या
राष्टीय निशुल्क क्रमांकावर संपर्क साधुन आपल्या शंकांचे निरसन करू शकतो.योग्य ते मार्गदर्शन
प्राप्त करू शकतो.
प्रश्न
क्र.६. ई-श्रम कार्ड ह्या पोर्टलर आत्तापर्यत भारतातील किती व्यक्तींनी नोंद केली आहे?
ई-श्रम कार्ड ह्या पोर्टलवर
आत्तापर्यत भारतातील 20 कोटीपेक्षा अधिक कामगार तसेच मजदुर वर्गाने
आपली नाव नोंदणी केली आहे.असे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने टविट करून
सांगितले आहे.
प्रश्न
क्र.७. ई श्रम कार्ड प्राप्त करण्यासाठी कुठल्याही कामगार तसेच मजदुराचे वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर : ई श्रम
कार्ड प्राप्त करण्यासाठी भारतातील कुठल्याही कामगार तसेच मजदुराचे वय हे किमान 16 आणि जास्तीत जास्त 59
असणे आवश्यक आहे.