![]() |
Niradhar Pension Yojana Maharashtra |
श्रावण बाळ योजना काय आहे.?
श्रावण बाळ योजना (Pension Scheme) | महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील निराधार वृद्ध नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेली महत्वाकांक्षी आणि मुख्य योजना आहे.या योजनेव्दारे महाराष्ट्र सरकार एक निश्चित रक्कम 1000/- रुपये दरमहिन्याला पेन्शन श्रावण बाळ योजना (Shravan Bal Yojana) देऊन राज्यतील निराधार व वृद्ध नागरीकांना आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सुरक्षा देऊन निराधार वृद्ध नागरिकांना स्वावलंबी बनवण्याचा या योजनेचा उद्देश आहे. Niradhar Pension Yojana Maharashtra
श्रावण बाळ योजना कोणासाठी आहे
आणि पात्रता काय आहे ? - Pension Scheme eligibility
महाराष्ट्र शासनाने श्रावण बाळ (Shravan Bal Yojana) या योजनेंतर्गत दोन श्रेणी बनविल्या आहे,श्रेणी अ आणि श्रेणी ब श्रेण्यांमध्ये असे नागरिक
असतील, श्रेणी अ मध्ये ज्यांचे कुटुंब (बीपीएल) यादीत
नोंदणीकृत आहे, तसेच श्रेणी ब मध्ये ज्यांच्या कुटुंबाचे
वार्षिक उत्पन्न एकूण 21,000/- रुपयाच्या आत आहे, आणि श्रावण बाळ Shravan Bal Pension
Scheme हि योजना महाराष्ट्रातील 65 वर्ष आणि 65
वर्षाच्या वरील वृद्ध निराधार नागरिकांसाठी लागू आहे.
श्रावण बाळ योजनेसाठी लागणारी आवश्यक
कागदपत्रे – Documents
वयाचा दाखला :- ग्रामपंचायत किंवा नगरपालिका / महानगरपालिका मधून अधिकृत जन्म
प्रमाणपत्र, शाळा
सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड मध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत
नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या अधीक्षक यांचा
किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव :- दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश
असल्याचा अधिकृत पुरावा.
रहिवासी दाखला :- ग्रामीणभागामधील
ग्रामसेवक, तलाठी,
मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार
यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
![]() |
Niradhar Pension Yojana Maharashtra |
श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज कसा
करावा ?
– online application form
श्रावण बाळ योजना Shravan Bal Yojana या योजनेसाठी पात्र लाभार्थी ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात,
अर्ज करण्यासाठी तुम्हाला तलाठी किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन
योजनेसाठी अर्ज करावा लागेल, यासाठी तहसील ऑफिस मध्ये
तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल, तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
तुम्हाला आपले सरकार APALE SARKAR PORTAL या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन
नोंदणी करावी लागेल.अधिकृत वेबसाईट
श्रावण बाळ योजनेमध्ये अर्ज
केल्यावर प्रक्रियेला किती वेळ लागतो ?
या योजनेच्या अंतर्गत अर्ज केल्यानंतर Shravan Bal Yojana योजनेच्या अधिकाऱ्यांना सर्व अर्जाची माहिती
आणि तपासणी व सर्व कागदपत्रांची पडताळणी करून संपूर्ण अर्जावर प्रक्रिया
करण्यासाठी 30 दिवसांचा वेळ लागतो.
श्रावण बाळ योजना 2023
अर्जाची स्थिती तपासणे
महाराष्ट्र श्रावण बाळ
योजनेसाठी अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर उमेदवार त्यांच्या अर्जाच्या स्थिती
शासनाच्या Apale Sarkar Portal या वेबसाईटवर भेट देऊन पाहू शकतात, अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया
खालीलप्रमाणे आहे.
तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत (Apale Sarkar) आपले सरकार
वेबपोर्टलवर भेट द्यावी लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज
उघडेल, या होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ''Track
Your Application'' या पर्यायावर क्लिक करा.
या पुढील स्टेप ड्रॉप-डाऊन
यादी मधून सबंधित विभाग आणि योजनेचे नाव निवडा व दिलेल्या जागेत तुमचा आयडी
प्रविष्ट करा आणि त्यानंतर go बटनावर क्लिक करा, हि प्रोसेस यशस्वीपणे केल्यानंतर तुम्हाला shravan bal yojana विषयी अर्ज केलेल्याची स्थिती कळेल.
श्रावण बाळ योजना लाभ आणि विशेषता
- मुलभूत गरजांसाठी वृद्ध नागरिकांना कुटुंबावर अवलंबून राहावे लागत होते, या योजनेमुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, आणि त्यांना समाजात सन्मानाने जीवन जगता येईल.
- श्रावण बाळ योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील निराधार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वृद्धांना दर महिन्याला 600/- रुपयांची आर्थिक सहायता करणार आहे.
- श्रावण बाळ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील वंचित आणि कमी उत्पन्न गटातील वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील.
- शासनाने हि योजना निराधार वृद्ध लोकांसाठी राबविल्यामुळे राज्यातील वृद्ध नागरिक आपल्या आर्थिक समस्यांवर मात करू शकणार आहे.
- महाराष्ट्र सरकारने या योजनेंतर्गत दोन श्रेणी बनविल्या आहे श्रेणी (अ) आणि श्रेणी (ब) श्रेण्यांमध्ये असे नागरिक असतील श्रेणी (अ) मध्ये ज्यांचे कुटुंब (बीपीएल) यादीत नोंदणीकृत आहे, तसेच श्रेणी (ब) मध्ये ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकूण 21,000/- रुपयाच्या आत आहे, आणि श्रावण बाळ हि योजना महाराष्ट्रातील वृद्ध निराधार नागरिकांसाठी लागू आहे.
शासनाच्या इतर योजना बघण्यासाठी येथे क्लिक करा.
अशा वेगवेगळ्या माहितीसाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.