![]() |
शेतकऱ्यांना मिळणार बियाण्यांसाठी अनुदान |
सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाने
शेतकऱ्यांसाठी अनुदानावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत बियाणे वाटप (Biyane
Vatap) योजना सुरू केली आहे.खरीप हंगाम 2023 करिता कृषि विभाग मार्फत नियोजन झालेले
असून आता महाडीबीटी पोर्टल वर बियाणे घटकासाठी अर्ज सुरू करण्यात आले आहेत.या
योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन कृषी विभागा कडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय
अन्न सुरक्षा योजना काय आहे?
बियाणे अनुदान (Biyane Anudan) योजनेच्या माध्यमातून
शेतकरी बांधवांना दोन प्रकारच्या बियाण्यांचे वाटप करण्यात येत असते.त्यातील पहिला
बियाण्याचा प्रकार म्हणजे प्रमाणित बियाण्यांचे वाटप करणे व दुसरा प्रकार म्हणजे
पीक प्रात्यक्षिक बियाण्यांची वाटप करणे होय. पिक प्रात्यक्षिक मध्ये त्याकरिता
लागणारे खत तसेच औषधी इत्यादी एका गावातील काही शेतकऱ्यांची निवड करून त्यांना ते
उपलब्ध करून देण्यात येते. आणि प्रमाणित बियाणे मध्ये प्रामाणिक असणाऱ्या
बियाण्यांच्या किट वाटप करण्यात येतात.
![]() |
शेतकऱ्यांना मिळणार बियाण्यांसाठी अनुदान |
अनुदान
किती टक्के मिळेल?
बियाणे घटक मध्ये कृषि विभाग मार्फत प्रमाणित बियाणे
वितरण आणि पीक प्रात्यक्षिक बियाणे या दोन घटकासाठी अर्ज स्वीकारले जातात. यामध्ये
प्रमाणित बियाण्या मध्ये निवड झाल्यानंतर शेतकर्याला 50% अनुदानावरती बियाणे दिले
जाते आणि पीक प्रात्यक्षिक मध्ये निवड झाल्यानंतर त्या शेतकर्यांना त्या पिकाचे
नवीन वाण हे मोफत दिले जाते.
अनुदानास
पात्र असलेली पीक : सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका , कापूस इ.
अर्ज
करण्याची अंतिम मुदत : 25 मे 2023 (बदल होऊ शकतो)
अर्ज करण्याचे संकेतस्थळ : महाडीबीटी फार्मर पोर्टल येथे क्लिक करा
अर्ज
करण्यासाठी आमच्या शाखेशी संपर्क करू शकता.
स्वप्नपूर्ती
मल्टी सर्विसेस
कुरुंदा
ता.वसमत जि.हिंगोली
मो.८३०८३५२०३०
शासनाच्या शेती विषयक योजना बघण्यासाठी येथे क्लिक करा.