![]() |
वाळू झाली स्वस्त आता वाळू मिळणार 600 रुपये ब्रास ! |
सर्व सामान्य नागरिकांना आनंदाची बातमी.महाराष्ट्र
शासनाने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून घर बांधकामास लागणारी वाळू
यावरील ठेकेदारांचे धंदे बंद करून अगदी माफक दरामध्ये वाळू मिळावी म्हणून योजना
सुरु केली आहे.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये एक छोटेसे घर
असावे अशी इच्छा असते.परंतु या धकाधकीच्या युगात छोटेसे घर सुद्धा परवडनसे झाले आहे.अगदी
रेती पासून ते सिमेंट पासून भाव हे गगनाला पोव्ह्चलेले आहेत.अश्यामध्ये सर्व
सामान्य नागरिक आपले घर कसे बांधू शकेल.याचसाठी शासनाने सर्व सामान्य नागरिकांना
वाळू स्वस्त दरामध्ये मध्ये देण्याचा निर्णय घेताला आहे.आता शासनातर्फे वाळू
स्वस्त झाली असून केवळ 600 रुपये प्रती ब्रास प्रमाणे यापुढे वाळू मिळणार असल्याने
सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. जाणून घेवूयात या योजनेची सविस्तर
माहिती.
घराचे बांधकाम करायचे म्हटले कि त्यासाठी वाळू आवश्यक
असते. परंतु वाळूचे दर अगदी गगनाला पोव्होचल्या मुळे सर्वसामान्य जनतेचा घर
बांधकाम खर्च आवाक्याबाहेर गेलेला आहे.अशातच शासनाकडून आनंदाची बातमी आलेली आहे
आणि ती म्हणजे वाळू केवळ ६०० रुपये ब्रासने उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे
घरांच्या किमती देखील आवाक्यात येणार आहेत.महसूल विभागाकडून ६०० रुपये प्रती ब्रास
दरात वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी मंत्रिमंडळ
बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.
![]() |
वाळू खरेदी संबधी नियम व अटी काय आहेत. |
वाळू
खरेदी संबधी नियम व अटी काय आहेत.
वाळू लिलाव
बंद झाल्याने डेपोतूनच केवळ ६०० रुपयात वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशी माहिती
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत
दिली.
घरकाम
करण्यासाठी वाळू हा महत्वाचा घटक असल्याने वाळू दलालांकडून वाटेल त्या दराने विकत
घ्यावी लागत असल्याने सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणत पिळवणूक होत आहे.
वाळू स्वस्त
झाली असल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे.
वाळू
स्वस्त झाली पण धोरणातील नवीन बदल काय आहेत.
- राज्यातील
नागरिकांना स्वस्त किमतीमध्ये वाळू मिळावी त्याचप्रमाणे अनधिकृत उत्खननाला आळा
बसावा या उद्देशाने शासनामार्फत अप्पर जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर समिती स्थापन
करून वाळू उत्खनन,
- साठवणूक व डेपो व्यवस्थापन आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे डेपोतून वाळू विक्री करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
- केंद्र
शासनाच्या पर्यावरण,
वन व वातावरणीय बदल मंत्रालय, खनिकर्म विभाग,
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, उच्च न्यायालय व
सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेले आदेश,
- अटी व शर्ती विचारात घेऊन पर्यावरण अनुमती व खाणकाम आराखडा इत्यादीबाबत कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे.
- याअगोदर प्रति ब्रास या परिमाणानुसार वाळूची विक्री करण्यात येत होती.
- त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून आता प्रती टनामध्ये वाळू विक्री करण्यात येणार आहे.
- वाळू उत्खनन करण्यासाठी इ निविदा काढण्यात येईल.
- वाळूची विक्री करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करण्यात येईल.
- महाखनिज वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येईल किंवा यासाठी शासनाने नवीन वेबसाईट तयार केली तर त्यावर अर्ज कारवा लागेल.
- वाळू विक्री करण्यासाठी वाळू डेपो निर्मिती करण्यात येईल. हा वाळू डेपो शहर किंवा गावाजवळ असेल.शक्यतो शासकीय जमिनीवर हा वाळू डेपो निर्माण करण्यात येईल.
- जर शासकीय जमीन मिळाली नाही तर भाडे तत्वावर खाजगी जमीन घेवून त्या ठिकाणी वाळू डेपोची निर्मिती करण्यात येईल.
- नदी असेल किंवा खाडी पात्र त्या ठीकांपासून ते वाळू डेपो पर्यंतचे क्षेत्र Geo fencing केले जाणार आहे.
- वाळू डेपो जवळच वाळूचे वजन करण्यात येईल शिवाय वाळू डेपोच्या परिसरात क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात येणार असून परीसारामध्ये काटेरी कुंपण करण्यात येणार आहे.
- जी वाहने वाळू वाहतूक करणार आहेत त्या वाहनांना जीपीएस बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
- डेपोतील वाळू संपेपर्यंत किंवा तीन वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी वाळू निविदा काढण्यात येणार आहे.
- जे वाहने वाळूची वाहतूक करणार आहेत त्यांना विशिष्ट रंग देण्यात येणार आहे.
- वाळू डेपोपासून ज्या ठिकाणी नागरिकांना वाळूची वाहतूक करायची असेल तो खर्च नागरिकांना करावा लगणार आहे.
कोणत्या
वेबसाईटवर अर्ज करावा आणि तो अर्ज कसा करावा.
यासाठी जर
तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल महाखनीज या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू
शकता.
वेबसाईटची
लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
ऑनलाईन
अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे.
- महाखनीज या वेबसाईटला भेट द्या.
- मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडा.
- अर्ज या पर्यायावर क्लिक करताच दोन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहिला पर्याय असेल आंतरराज्य खनिज परिवहन व दुसरा पर्याय असेल तात्पुरता प्रस्ताव.
- उदारणार्थ या ठिकाणी तात्पुरता प्रस्ताव या पर्यायावर क्लिक करा.
- काही सूचना येईल त्या वाचून घ्या.
- sign in या पर्यायावर क्लिक करा.
- User name आणि passward नसेल तर Sign Up या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे नाव दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करा. तुमचा मोबाईल टाका.
- आता तुमच्या
मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा पासवर्ड तयार करा आणि सेव्ह या पर्यायावर क्लिक करा.
- जसेही तुम्ही सेव्ह या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलवर एक युजरनेम पाठविला जाईल.
- युजरनेम पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगइन करा.
- रेवेन्यु
डिपार्टमेंटचा dashboard
तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल. स्क्रीनच्या डाव्या बाजूला
असलेल्या online application या पर्यायावर क्लिक करा.
- आता या ठिकाणी वाळू संदर्भात विविध प्रकरचे अर्ज आहेत त्यापैकी एकावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.