Hot Widget

Type Here to Get Search Results !

मागासवर्गीयांसाठी मिळणार १ लाखा पर्यंत थेट कर्ज योजना ! Mahatma Phule Thet Karj Yojana Get Loan

 

मागासवर्गीयांसाठी मिळणार1लाखा पर्यंत थेट कर्ज योजना ! Mahatma Phule Thet Karj Yojana

        नमस्कार मित्रांनो, सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपले जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत आहे.परंतु मानवाच्या वाढणाऱ्या गरजा ह्या जास्त प्रमाणात आहेत.आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्तिथी हि खूप वाईट आहे.प्रत्येक व्यक्तिला आपली परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी व्यवसाय करावा वाटत असतो.परंतु आर्थिक परिस्तिथी बिकट असल्याने तो कोणताही व्यवसाय उभारू शकत नाही.पाहिजे तो आर्थिक विकास करू शकत नाही.प्रत्येक व्यक्ती हा स्वावलंबी व कर्तव्यदक्ष व्हावा म्हणून त्यांच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लावण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना अमलात आणत आहे.त्यामध्ये मराठा समाजासाठी ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकासमहामंडळाची’ स्थापना करण्यात आली आहे.तर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी “महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना” राबविल्या जातात.आज आपण महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या  “थेट कर्ज योजने” (Thet Karj Yojana Loan Scheme) विषयी माहिती बघणार आहोत.

मागासवर्गीयांसाठी मिळणार1लाखा पर्यंत थेट कर्ज योजना ! Mahatma Phule Thet Karj Yojana
व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य

यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 1,00,000/- पर्यंतचे कर्ज Get Loan महामंडळामार्फत मंजूर केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग रु. 85,000/- इतका असून अनुदान रु. 10,000/- (मर्यादेसह) आहे. तसेच अर्जदाराचा सहभाग रु. 5,000/- आहे. सदर कर्जाची परतफेड ( Loan Return ) समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावयाची आहे. सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% द.सा.द.शे व्याजदर आहे.

थेट कर्ज योजना राबविताना अंमलबजावणीची कार्यपद्धती

        महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 1,00,000/- पर्यंतचे कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग रु. 85,000/- इतका असून अनुदान रु. 10,000/- (मर्यादेसह) आहे. तसेच अर्जदाराचा सहभाग रु. 5,000/- आहे. सदर कर्जाची loan परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावयाची आहे. सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% द.सा.द.शे व्याजदर आहे.

        मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व जास्तीतजास्त लोकांना लाभ घेता यावा. तसेच बँकेमार्फत कर्ज देताना येणाऱ्या अडचणी व कर्ज मंजूर होताना होणारा विलंब टाळण्याकरिता थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. 25,000/- वरुन रु. 1,00,000/- पर्यंत वाढविण्याबाबत शासन निर्णय क्रमांक एमपीसी-2017/प्र.क्र.274/महामंडळे, दिनांक 21 डिसेंबर 2018 नुसार मंजूरी दिलेली आहे.सदर योजनेअंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलातून थेट कर्ज Loan Scheme योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे.

  • प्रकल्प मर्यादा रु. 1,00,000/- पर्यंत
  • महामंडळाचा सहभाग रु. 85,000/- इतका असून अनुदान रु. 10,000/- (मर्यादेसह) आहे.
  • अर्जदाराचा सहभाग रु. 5,000/- आहे.
  • सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात (36 महिन्यांच्या) आत करावयाची आहे.
  • सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% द.सा.द.शे. व्याजदर आहे.

मागासवर्गीयांसाठी मिळणार1लाखा पर्यंत थेट कर्ज योजना ! Mahatma Phule Thet Karj Yojana
आपला छोटासा व्यवसाय करा सुरु...

कर्ज मंजूरीकरिता आवश्यक कागदपत्रे – Loan Approval Documents

  1. जातीचा दाखला
  2. उत्पन्नाचा दाखला (चालू वर्षाचा)
  3. बँकेचे पासबुक (राष्ट्रीयकृत)
  4. रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
  5. व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते

  • अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते.
  • प्रादेशिक व्यवस्थापक यांचेकडे मंजूरी व निधी मागणी केली जाते.
  • प्रादेशिक व्यवस्थापक मुख्य कार्यालयाकडे संबंधित कर्ज प्रकरणात निधी मागणी करतात
  • संबंधित कर्ज प्रकरणांत जिल्हा कार्यालयाकडून लाभार्थ्याच्या सहभागाची रक्कम वगळून पहिला हप्ता (75%) अदा केला जातो व प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केलेल्या तपासणी अभिप्रायानुसार दुसरा हप्ता (25%) अदा केला जातो.(Get Loan in Instunt)

थेट कर्ज योजने विषयी अजून सविस्तर माहिती बघण्यासाठी अधिकृत साईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

सविस्तर माहिती - अधिकृत साईट

ऑनलाईन अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ऑनलाईन नोंदणीची अधिकृत साईट

कर्ज/ योजना अर्जदारांना महत्वाची सूचना


अशा वेगवेगळ्या माहितीसाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा. 

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies