Hot Widget

Type Here to Get Search Results !

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली  : अनुसूचित जमातीच्या हिंगोली व परभणी जिल्ह्यातील मुलामुलींना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

    या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासाबेत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधित छायांकित प्रत व दारिद्र्य रेषा अनुक्रमांक नमूद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही एक लाख एवढी असून यासाठी सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी समतीपत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा, वैद्यकीय अधिकारी यांचे विद्यार्थी निरोगी असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात यावे.  

या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटित, निराधार व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. प्रकल्प कार्यालयात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून दि. 30 एप्रिल, 2023 पर्यंत परिपूर्ण प्रवेश अर्ज जमा करणे आवश्यक आहे. 

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा  संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली  येथे संपर्क साधावा. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन छंदक लोखंडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे. 

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies