Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला बारा हजार ! PM Kisan eKYC Namo Shetkari

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला बारा हजार ! PM Kisan eKYC Namo Shetkari
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला बारा हजार !

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता केंद्र सरकार प्रमाणेच महाराष्ट्र सरकार ही “नमोशेतकरी महासन्मान निधी” सुरू करणार आहे.शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजनेची अमलबजावणी राज्याकडूनही करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 फेब्रुवारीला केली.त्यानुसार महाराष्ट्रामध्ये “नमो शेतकरी महासन्मान निधी” सुरू करण्यात येणार आहे.ही योजना केंद्र सरकारच्या निकषानुसारच राबवली जाणार आहे.मागील 13 व्या हप्त्यानुसार 81 लाख 38 हजार 198 शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून दोन हजार रुपये चा हप्ता मिळाला होता.आता यासोबत राज्य सरकारकडूनही प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण 4000 हजार रुपये शेतकऱ्यांना “नमो शेतकरी महासन्मान निधीद्वारे” मिळतील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी 10 लाख 39 हजार शेतकऱ्यांना 23 हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे.यात आतापर्यंत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.त्यानंतर केंद्र सरकारने वेगवेगळे निकष लावल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली.त्यात प्रामुख्याने “ई-केवायसी” बंधनकारक करण्यात आली आहे. आयटी रिटर्न (IT Return) भरणारे परंतु नावावर शेती असलेले,सरकारी अधिकारी व कर्मचारी अशांना यादीतून वगळण्यात आले आहे.तसेच शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होत आहेत अशा खात्यांना आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पी एम किसान(PM Kisan) योजनेअंतर्गत केंद्र सरकारने या योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या नावावर जमा केला आहे.तेराव्या हप्त्यादरम्यान या योजनेत राज्यातील आता केवळ 81 लाख 38 हजार 198 शेतकरी पात्र ठरले आहेत. आता यात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे विस्तारित स्वरूप म्हणजे “नमो शेतकरी महासन्मान निधी” असणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचे निकष राज्याच्या योजनेलाही लागू करण्यात यावेत अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्य सरकारला केली आहे. 

 पुढील हप्ता मिळवण्यासाठी हे करा.अन्यथा मिळणार नाहीत बारा हजार.

 • पी एम किसान पोर्टल वर जाऊन आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी.
 • राष्ट्रीयकृत बँकेला आपले आधार कार्ड जोडून घ्यावे.
 • आधार कार्ड सातबारा बँक पासबुक यामधील नावांमध्ये काही तफावत असल्यास दुरुस्त करून घ्यावे.
 • आधार कार्ड लिंकिंग साठी पोस्ट मधील बँकेचे खाते काढून घ्यावे.(Indian  Post Payment Bank)
 • वरील सर्व बाबींची पूर्तता ही 30 एप्रिल पूर्वी करावी जेणेकरून आपल्याला पुढील हप्ता पडेल.

 ई-केवायसी करण्यासाठी खालील दोन पर्याय.

    "पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी eKYC पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन आणि बायोमेट्रिक पद्धती वापरू शकतात.पीएम किसान योजनेच्या वेबसाइटनुसार पात्र शेतकरी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) द्वारे स्वतः eKYC पूर्ण करू शकतात. तर, बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसीसाठी लाभार्थीला जवळच्या CSC केंद्रावर (कॉमन सर्व्हिस सेंटर) जावे लागेल."

 ऑनलाइन ई-केवायसी (eKYC) ची प्रक्रिया OTP द्वारे.

 • पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
 • वेबसाइटच्या उजव्या बाजूला असलेल्या eKYC च्या पर्यायावर क्लिक करा.
 • आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर सर्च करा.
 • आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
 • दिलेल्या कॉलममध्ये मोबाईलवर मिळालेला ओटीपी क्रमांक टाका.
 • यांनतर तुमचे eKYC अपडेट केले जाईल.

 ऑनलाइन ई-केवायसी (eKYC) ची प्रक्रिया OTP द्वारे लिंक साठी येथे क्लिक करा.

 ऑनलाइन ई-केवायसी (eKYC) ची प्रक्रिया बायोमेट्रिक द्वारे.

 • जवळच्या CSC केंद्राला (कॉमन सर्व्हिस सेंटर) भेट द्या.
 • पीएम किसान खाते अपडेट करण्यासाठी आधार कार्ड द्या.
 • खात्यात लॉग इन करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत वापरा.
 • आधार कार्ड क्रमांक अपडेट केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
 • यानंतर, केवायसी अपडेटची पुष्टी मोबाइलवर येईल आणि अशा प्रकारे ऑफलाइन केवायसी अपडेट होईल.

  ऑनलाइन ई-केवायसी (eKYC) ची प्रक्रिया बायोमेट्रिक द्वारे लिंक साठी येथे क्लिक करा. हे हि वाचा पी.एम.किसान हप्ता धारकांसाठी अती महत्वाचे...

अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. 


शासनाच्या शेती विषयक योजना बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies