Hot Widget

Type Here to Get Search Results !

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 350 रुपये अनुदान

 

शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 350 रुपये अनुदान

कांदा अनुदानासाठी अर्ज करणे सुरू झाले आहे कांदा अनुदान योजना या योजनेंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 350 रुपये अनुदान देण्यात येत आहे.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज सुरू झाले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत होते परंतु या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आता शेतकऱ्यांना लवकरच कांदा पिकाचे अनुदान मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे

हा अर्ज कोणाकडे करावा लागणार आहे त्याची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

याशिवाय अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे याची माहिती देखील जाणून घेऊया. या अनुदानासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

कांदा अनुदानासाठी अर्ज करणे सुरू पहा सविस्तर
सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे.

यासाठी  दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या

शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व  जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना खरेदी विक्री केंद्रावर आपला माल विक्रीसाठी अर्ज केले आहे आशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणर आहे.

अर्ज व लागणारी कागदपत्रे
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन २०२२ -२०२३ चा लाभ घेण्याकरिता अर्ज करणे सुरू झाले आहे.

विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र

तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

या पैकी कोणत्याही कार्यालय, खरेदी विक्री केंद्र किंवा संबंधित अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे.

लागणारी कागदपत्रे
  1. विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी
  2. कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा
  3. बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
  4. आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत
  5. ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र. आवश्यक आहे.
सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत, असे पणन संचालक यांनी कळविले आहे.
Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies