![]() |
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा |
🌾 राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिल्याप्रमाणे राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यासाठी काल (दि. 10 एप्रिल) शासन निर्णय काढण्यात आला आहे.
🌦️ शेतीपिकांचे दि. 4 ते 8 मार्च व दि. 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
📃 मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे.
💰 महसुली विभागनिहाय वितरित निधी:
- ▪️ अमरावती विभाग – 24 कोटी 57 लाख 95 हजार
- ▪️ नाशिक विभाग - 63 कोटी 9 लाख 77 हजार
- ▪️ पुणे विभाग - 5 कोटी 37 लाख 70 हजार
- ▪️ छत्रपती संभाजी नगर - 84 कोटी 75 लाख 19 हजार
👉 एकूण निधी- 177 कोटी 80 लाख 61 हजार