Hot Widget

Type Here to Get Search Results !

बालसंगोपन योजनेद्वारे एकल पालकांच्या मुलांना मिळणार दर महिन्याला २२५० रुपये ! Childcare Scheme Get Rs. 2250 per month


बालसंगोपन योजनेद्वारे एकल पालकांच्या मुलांना मिळणार दर महिन्याला २२५० रुपये ! Childcare Scheme Get Rs. 2250 per month
Childcare Scheme Get Rs. 2250 Per Month

१ एप्रिल पासुन बालसंगोपन योजनेत मुलांना २२५० रुपये मिळणार  आहेत.

                कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून अनेक मुले अनाथ झाली आहेत. देशात अशी हजारो मुले आहेत, ज्यांचे आई-वडील दोघेही कोरोनाने बळी पडले आहेत. अशीही अनेक मुलं आहेत ज्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील एकही सदस्य उरलेला नाही. महाराष्ट्र सरकारने 2008 मध्ये सुरु केलेली बाल संगोपन योजना अशाच मुलांची काळजी घेण्यासाठी सुरु करण्यात आली होती, वाचक मित्रहो आज आपण महाराष्ट्र बाल संगोपन योजना 2023 या योजनेच्या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तरी हा लेख संपूर्ण वाचावा.

                समाजात मुलांचा मोठा वर्ग असतो आणि त्यांना देशाची सर्वात मौल्यवान संपत्ती मानली जाते. वंचित मुलांसाठी संरक्षण आणि विकास कार्यक्रम सर्व मुलांसाठी समान संधी प्रदान करणे आवश्यक आहे जेणेकरून इष्टतम वैयक्तिक विकास होईल. कुटुंबाची सामाजिक-आर्थिक परिस्थिती वारंवार कौटुंबिक निराशा, विखंडन आणि मुलाची निराधारता दर्शवते. संकटात असलेल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, विशेष कार्यक्रम विकसित केले गेले आहेत. असुरक्षित मुलांच्या कल्याणाचा प्रचार करून, त्यांचे दुर्लक्ष, शोषण आणि अत्याचारापासून संरक्षण करून आणि वंचित मुलांना काळजी आणि आश्रय प्रदान करून, या विशेष सेवा पालकांच्या काळजी आणि पर्यवेक्षणाला पूरक किंवा बदलतात.

                बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते.या योजनेत कालपर्यंत ११०० रुपये मिळत होते .ते आज एक एप्रिल पासून २२५० रू मिळणार आहेत. तेव्हा आपल्या आजूबाजूच्या विधवा महिला व अनाथ बालकांना ही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

बाल संगोपन योजना अंतर्गत या मुलांना लाभ मिळेल.

या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे बालकांना लाभ देण्यात येईल
  1. ज्या  मुलांचे पालक काही कारणांमुळे मृत्यू पावले आहेत, अशा मुलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात येतो
  2. कृष्ठरोग झाला असललेल्या मुलांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल
  3. अशी मुले ज्यांना दत्तक देणे शक्य नाही व ज्याच्या पालकांसंबंधित काहीच माहिती नाही आणि जे अनाथ आहेत
  4. गुन्ह्याच्या अंतर्गत कारावासात असलेली मुले
  5. या योजनेच्या अंतर्गत अविवाहित माता लाभ मिळवू शकेल
  6. मुलांना सांभाळण्यास असमर्थ असलेले कुटुंब
  7. या योजनेचा लाभ मतीमंद मुलांना देण्यात येईल
  8. तसेच अपंग मुलांना सुद्धा योजनेचा लाभ मिळेल
  9. मानसिक रुग्ण असलेल्या पालकांची मुले
  10. एखाद्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती असलेल्या पालकांच्या मुलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल
  11. कौटुंबिक संघर्षामुळे आणि एकटे पालक असलेली मुले
  12. ज्या मुलांचे आई-वडील घटस्फोटीत आहेत अशी मुले
  13. त्याचप्रमाणे ज्या मुलांचे आई वडील दोन्हीही अपंग आहेत
  14. अशी बालके ज्यांना HIV झालेला आहे
  15. ज्या मुलांच्या आई-वडीलांना HIV झालेला आहे अशी मुले
  16. तसेच अति घृणा व दुर्लक्ष आणि पालकांमधील अत्यंत वैवाहिक संघर्ष किंवा पोलीस तक्रार झालेली कुटुंब, अशा परिस्थितीतील मुले
  17. त्याचप्रमाणे जी मुळे पूर्ण अनाथ आहेत अशी मुले
  18. या योजनेच्या अंतर्गत गुन्ह्यात जन्मठेप झालेल्या कैद्याची मुले लाभ मिळवू शकतात
  19. तसेच घटस्फोट, मृत्यू, परित्याग, विभक्तीकरण, गंभीर आजार, अविवाहित मातृत्व, पालक गंभीर आजारी असणे इत्यादी कारणांमुळे विभक्त पालक असलेल्या परिवारातील मुले
  20. एखाद्या मुलाला कॅन्सर झाला असेल
  21. अशा परिवारातील मुले ज्या परिवारात पालकांपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसरा पालक कमावता नाही, अशा परिस्थितीत त्या मुलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात येतो.
  22. शाळेत न जाणारी मुले सुद्धा या योजनेचा लाभ मिळवू शकतात
  23. तसेच शाळेत न जाणारे बाल कामगार म्हणजे कामगार विभागाने ज्यांची सटका केली आहे अशी मुले सुद्धा या योजनेंतर्गत लाभ मिळवू शकतात.


बाल संगोपन योजनेचे नियम

  1. बाल संगोपन योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलांसाठीच आहे.
  2. महाराष्ट्र राज्याबाहेरील मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे वय 18 वर्षे आणि त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  4. सरकार-मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी गरजू मुलांची निवड करून बालकल्याण समितीसमोर मुलांना सादर करणे आवश्यक आहे. बालकल्याण समितीच्या मान्यतेशिवाय बाल संगोपन योजनेंतर्गत त्या बालकांना कोणतेही अनुदान दिले जाणार नाही.

वयाची अट काय आहे ?

अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोघानाही प्रत्येकी २२५०रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.

यासाठी उत्पन्न अट किती आहे ?

पालकाचे उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.

घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांना हा लाभ मिळतो का ?

होय,कारण त्या एकल महिला असल्याने नक्की लाभ मिळतो फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावेत.

बाल संगोपन योजना महाराष्ट्र उद्देश्य (Objectives)

                आपल्या सर्वांना माहित आहे की, आपल्या देशात अशी अनेक मुले आहेत जी अत्यंत कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत, आणि अशा परिस्थितीत त्यांना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बाल संगोपन योजना महाराष्ट्र 2023 सुरू केली आहे. या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरमहा 425 रुपये दिले जातील. ज्याचा वापर करून मुले आपला अभ्यास पूर्ण करू शकतात आणि त्यांचे जीवन सुधारू शकतात.
                एखाद्या मुलाचे पालक काही कारणाने मरण पावतात किंवा इतर कारणांमुळे मूल अनाथ होते, अशा परिस्थितीत त्याला शिक्षण, आरोग्य, अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते, अशा मुलांचे संगोपन, पोषण, शिक्षण देणे. 18 वर्षे वयापर्यंत, असे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
                बाल संगोपन योजनेंतर्गत लाभार्थी बालकांना सशक्त व स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील अनाथ मुलांचे जीवनमान उंचावणे, त्यांचे जीवन सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुलांना त्यांच्या संगोपनासाठी इतर स्त्रोतांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, म्हणून नवीन किंवा उद्देशपूर्ण बाल संगोपन योजना सुरू केल्या आहेत. मुलांचे भविष्य उज्वल करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

अर्ज कोठे दाखल करायचा?

अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या गावी बालकल्याण समिती समोर सोबत मुलांना नेऊन फॉर्म जमा करावा. बालकल्याण समिती कार्यालय शक्यतो मुलांच्या अभिरक्षण गृहात असते.सोबत ज्यांचा फॉर्म भरला आहे त्या मुलांना सोबत नेणे सक्तीचे आहे.

या अर्जाला कोणती कागदपत्र जोडणे आवश्यक आहे ?

याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून घ्यावा
  1. योजनेसाठीचा विहीत नमुन्यातील अर्ज
  2. पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेराँक्स
  3. मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  4. तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
  5. पालकांचे मृत्यू असल्यास मृत्युचा दाखला
  6. पालकाचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा)
  7. मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक
  8. मृत्यूचा अहवाल - ( कोविडने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल)
  9. रेशनकार्ड झेराँक्स .
  10. घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा रंगीत फोटो ( दोन मुले असल्यास दोन्ही मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो )
  11. मुलांचे ३ पासपोर्ट फोटो

योजनेचा जि.आर डाउनलोड करा.

दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवावे

आपल्या परिचयाच्या या निकषात बसणाऱ्या मुलांच्या एकल पालकांना ही योजना समजावून सांगा व ही योजना मिळवून द्यायला मदत करावी. दोन मुले असतील तर दर महिन्याला ४५०० रुपये या मुलांना शिक्षणासाठी मिळू शकतील..

हि योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांन पर्यंत पाठवा.

आशा वेगवेगळ्या योजनेच्या माहितीसाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.



Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies