Hot Widget

Type Here to Get Search Results !

RTE Admission : प्रतीक्षा संपली ! ‘आरटीई २५ टक्के प्रवेशाची ऑनलाइन निकाल/सोडत उद्या होणार जाहीर; ही कागदपत्रे तयार ठेवा

 


RTE Lottery Result Date 2023-24 : तुम्ही आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन सोडत कधी निघणार या प्रतीक्षेत असाल, तर मग इकडे नक्की लक्ष द्या. शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत येत्या बुधवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार आहे.

राज्यातील सुमारे एक लाख एक हजार ९६९ जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन लाख ६४ हजार ४७२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे. यावेळी ऑनलाइन सोडतीत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येईल.

RTE Lottery Result 2023-24 तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिनमध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसणार आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी ‘Https://Rte25admission.Maharashtra.Gov.In/Adm_portal/Users/Rteindex’ 

या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24 :

 • रहिवाशी प्रमाणपत्र वास्तव्याचा पुरावा 
 • जन्माचा दाखला (जन्म दाखला)
 • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न)
 • जातीचा दाखला – वंचित जात सवर्गातील असल्यास वडिलांचे व बालकाचे जात प्रमाणपत्र 
 • दिव्यांग असल्यास – जिल्हा शल्यचिकित्सक यांचे किमान 40% चे दिव्यांग प्रमाणपत्र
 • एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यांचे (Single Parent) कागदपत्रे
 • घटस्फोटित महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
 • न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
 • विधवा महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
 • HIV बाधित/प्रभावित असल्यास संबंधित कागदपत्रे
 • अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे

महत्वाचे – आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक सर्व कागदपत्रे ही ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतची असावीत. त्यानंतरचे कागदपत्रे स्वीकारली जात नाही याची काळजी घ्या.

याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी ‘Https://Rte25admission.Maharashtra.Gov.In/Adm_portal/Users/Rteindex

 या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

लॉटरीत नंबर लागल्यानंतर, अर्जातील माहितीची पडताळणी

RTE Lottery जाहीर झाल्यानंतर प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना त्यांनी अर्जात नमूद केलेले सर्व कागदपत्रे त्यामध्ये जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मुलाचे आधारकार्ड, आर्थिक उत्पन्न गटातील पालकांना  एक लाखाच्या आतील उत्पन प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र अशी सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. प्रवेश निश्चित झालेल्या म्हणजेच लॉटरीत नंबर लागलेल्या मुलांच्या पालकांच्या मोबाईलवर मेसेज प्राप्त होईल.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies