Hot Widget

Type Here to Get Search Results !

मराठा तरुणांना व व्यावसायिकांना मिळणार बिनव्याजी कर्ज ! Annasaheb Patil Karj Yojana and Tractor Yojana

 

मराठा तरुणाना व व्यावसायिकांना मिळणार बिनव्याजी कर्ज ! Annasaheb Patil Karj Yojana and Tractor Yojana
Annasaheb Patil Karj Yojana and Tractor Yojana

 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे दिल्या जाणाऱ्या योजना.

 • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 
 • गट कर्ज व्याज परतावा योजना
 • गट प्रकल्प कर्ज योजना

वरीलपैकी, 'वैयक्तिक कर्ज व्याज परतावाया योजनेबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

या क्रांतीच्या युगामध्ये आपला देश तर पुढे जात आहे परंतु मराठा मागास व्यक्ती हा मागेच राहत आहे.सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येक याक्ती हा आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडला आहे.तो आपली अर्थी परिस्थिती बदलण्यासाठी खूप प्रयत्नशील झाला आहे.परंतु त्याच्या जवळ कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नाही व तो व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे हि नाहीत.तो अशा परीस्थित करेल तरी काय.याच परिस्थितीला बदलण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना  केली. आता या महामंडळाद्वारे मराठा होतकरू , गरजू व नव उद्योजकांना मदतीचा हात देण्यासाठी बँक तर्फे कर्ज पुरवले जाते ते हि अगदी बिनव्याजी.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना :-

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील होतकरू,गरजू व नव उद्योजकांना मदतीचा हात देण्यासाठी बँक तर्फे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी कर्ज पुरविले जाते. त्या कर्ज रक्ममेवरील व्याज परतावा हा आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केला जातो. म्हणजेज, लाभार्थास बिनव्याजी कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना सुरु करण्यात आली.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना व्याजदर व परतावा लाभ :-

मराठा प्रवर्गा करिता (ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख पेक्षा कमी असणारे व्क्ती) असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या व्यक्तीला रुपये १० लाख पर्यंत कर्ज मंजूर केले जाते. हे कर्ज मंजूर झाल्यानंतर व लाभार्थीने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के च्या मर्यदित) लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा थेट जमा करण्यात येते.

या योजनेकरिता करिता एकूण प्रस्तावित निधीच्या किमान ४ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येते.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना लाभार्थी पात्रता :-

 • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा.
 • लाभार्थी वयोगट मर्यादा पुरुषांसाठी ५० तर महिलांसाठी ५५ वर्ष एवढे असावे.
 • लाभार्थीने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • दिव्यांगाकरिता, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
 • एका व्यक्तीला केवळ एका योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
 • बँक खाते आधारकार्ड सोबत लिंक केलेले असावे.
 • महामंडळाच्या ऑनलाईन वेबपोर्टलवर नाव नोंदणी केलेली असावी.
 • लाभार्थी कोणत्याही बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना काही महत्वाचे मुद्दे :-

 • लाभार्थी प्रकल्पाचे क्षेत्र पूर्णतः महाराष्ट्र राज्यातील असावे. त्यामध्ये, कृषी लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री आणि सेवा क्षेत्रे असावीत.
 • एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येतो.
 • या योजनेअंतर्गत एकाच कुटूंबातील ( रक्त नाते संबंधातील ) व्यक्ती कर्जाकरीता सहकर्जदार राहीले असतील, तर अशा प्रकरणांना देखील महामंडळ मंजूरी देत आहे. परंतू अर्जदाराचे नाव प्रथम कर्जदार म्हणून असणे आवश्यक असेल.
 • जर लाभार्थीने मध्येच नियमित कर्ज परतफेड केली नाही तर व्याज परतावा दिला जात नाही.
 • या योजनेअंतर्गत, महामंडळ लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल + व्याज) अनुदान स्वरुपात अदा करेल. तसेच त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त ३ लाखापर्यंत (१२ टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज व्याज परतावा करेल. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत-जास्त रु. ३ लाखापर्यंत व्याज परतावा देण्यात येईल.
 • कर्ज देणाऱ्या बँकेच्या नियमानुसार व्याजाची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतर, एक-रकमी स्वरुपात महामंडळ हे लाभार्थ्याच्या आधारलिंक कर्ज खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करेल. हा परतावा प्रत्येक महिन्याला वेळेवर हफ्ता परतफेड केल्यास देण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना अर्ज करण्यासाठी  कागदपत्रे:

    अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात. Annasaheb Patil Loan Documents List.

 1. आधार कार्ड
 2. रेशनकार्ड 
 3. पॅन कार्ड 
 4. शाळा सोडलेला दाखला (टी.सी)
 5. उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाख पर्यंत आवश्यक तहसीलचा)
 6. दिव्यांग प्रमाणपत्र (असेल तर)
 7. प्रकल्प अहवाल

ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केल्यानंतर, प्रत्यक्ष बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे:

 1. आधार कार्ड 
 2. मतदार कार्ड / पण कार्ड / वीज बिल
 3. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स
 4. बँक खाते / स्टेटमेंट
 5. सिबिल रिपोर्ट
 6. व्यवसाय प्रकल्प अहवाल
 7. व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

बँकेतून कर्ज मंजूर झाल्यानंतर, व्याज परताव्यासाठी अर्जदाराने महामंडळास (ऑनलाईन) सादर करावयाची कागदपत्रे:

 1. बँक कर्ज मंजुरी पत्र 
 2. लोन खाते बँक स्टेटमेंट 
 3. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स
 4. व्यवसाय प्रकल्प अहवाल 
 5. व्यवसायाचा फोटो
 अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो.
 1. नवीन व्यवसाय सुरु करणारा लाभधारक (मराठा लाभार्थी)
 2. जुन्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी (मराठा लाभार्थी)
 3. शेतकरी (शेतीसाठी पूरक व्यवसाय करण्यासाठी) (मराठा लाभार्थी)

अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या शेती विषयक योजना बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies