Hot Widget

Type Here to Get Search Results !

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागेल त्याला गाळ ! Gal Mukta Dharan Gal Yukta Shivar Farmer Scheme

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागेल त्याला गाळ ! Gal Mukta Dharan Gal Yukta Shivar Farmer Scheme
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागेल त्याला गाळ !

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत माळरान जमीन होईल सुपीक

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या नावावरती खडकाळ शेत जमीन आहे किंवा एखादी पडीक जमीन आहे.त्याचा वापर तुम्हाला करता येत नाही किंवा त्या पडीक जमिनीमधून किंवा जे काही खडकाळ जमीन आहे यामधून पाहिजे तसे उत्पन्न तुम्हाला मिळत नाही. मग याला काय करावे लागेल तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्याकडे ही जमीन असेल तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना सुरु झाली आहे.

या योजनेच्या माध्यमातून तुमची जे काही खडकाळ व पडीक जमीन आहे.त्या जमिनीमध्ये तुम्हाला गाळ दिल जाते मग हे गाळ कशा पद्धतीने दिले जाते या गाळयुक्त शिवार चे फायदे काय आहेत.त्यानंतर हे राज्य शासनाच्या माध्यमातून जो GR घेण्यात आलेला आहे तो कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरिता हा लेख संपूर्ण काळजीपूर्वक वाचा व तुमच्या जवळील शेतकऱ्यांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

गाळमुक्त धरण…गाळयुक्त शिवार योजना सुरू…
गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार योजना सुरू

गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार योजना सुरू

मित्रांनो गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबवणे बाबत महाराष्ट्र शासन वृद्ध व जलसंधारण विभागाअंतर्गत 16 जानेवारी 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 6 मे 2017 मुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती मार्च 2019 ला ही योजना संपलेली असल्याने सदर योजना आहे.त्या स्वरूपात राबवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता 6 मे 2017 मध्ये जो शासन निर्णय घेण्यात आला होता त्यानुसारच ही योजना राबवली जात आहे.(Gal Mukta Dharan Gal Yukta Shivar Farmer Scheme)

आता परत या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी ही योजना परत सुरु करण्यात आलेली आहे 6 मे 2017 मध्ये जो शासन निर्णय घेण्यात आला होता तो शासन निर्णय परत एकदा महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेला आहे म्हणजे ही योजना परत एकदा सुरू करण्यात आलेली आहे.योजना ज्या वेळेस सुरु झाली होती त्यावेळी शेतकरी बांधवानी या योजनेस अतिशय चांगला प्रतिसाद दिला होता. अगदी तसाच प्रतिसाद यावेळी देखील शेतकरी बांधवानी द्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या प्रधान सचिवानी केलेले आहे.

खालीलप्रमाणे असेल गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना.
खालीलप्रमाणे असेल गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना.

खालीलप्रमाणे असेल गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना.(Gal Mukta Dharan Gal Yukta Shivar Farmer Scheme)

या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग : या योजनेमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असणे ही प्राथमिक अत्यावश्यक स्वरुपाची अट आहे.

खाजगी व सार्वजनिक भागिदारी :-  गाळ उपसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च शासनाकडून तसेच सीएसआर च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून करण्यात येणार आहे.अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे जीओ टॅगिंग, योजनेची संगणक प्रणालीवर माहिती संकलित करणे इत्यादी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल.

संनियंत्रण व मुल्यमापन:-  या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे स्वतंत्रपणे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यात येणार आहे.२५० हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व ५ वर्षापेक्षा जुन्या तलावांना प्राधान्यक्रम राहील.केवळ गाळ उपसा करण्यास परवानगी राहील व वाळू उत्खननास पुर्णत: बंदी असेल.या योजनेचे अमलबजावणी अधिकारी याची जबाबदारी उप विभागीय अधिकारी (प्रांत), महसूल विभाग यांचेवर सुपूर्द करण्यात येत आहे.

सदर योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

अ) शेतकरी / अशासकीय संस्था यांनी धरणातील गाळ स्वखर्चाने काढून शेतात वाहून नेणे.

शेतकरी / अशासकीय संस्था यांची जबाबदारी-

  • गाळ साचलेल्या धरणालगत क्षेत्रातील शेतकरी किंवा अशासकीय संस्था यांनी असा गाळ स्वखर्चाने काढून व त्यांच्या शेतात वाहून नेण्याची कार्यवाही ते करणार असल्याची सूचना अशा कामाच्या वेळापत्रकाचा तपशिल नमूद करुन संबंधीत तहसिलदार / तलाठी / धरण यंत्रणा उप अभियंता यांना द्यावी.
  • ० ते १०० हे. सिं. क्षमतेच्या धरणातील गाळ काढण्याच्या सूचनेसोबत जोडण्यात येणारे वेळापत्रक हे किमान ४८ तास (२ दिवस) कालावधीनंतर काम सुरु करणारे असावे.
  • तसेच १०१ ते २५० हे. सिं. क्षमतेच्याबाबत असे वेळापत्रक हे किमान ३ दिवसांच्या कालावधीनंतर काम सुरु करणारे असावे.
  • ० ते १०० हे. सिंचन क्षमता असलेल्या धरणाच्या भिंतीपासून ५ मी. व १०० ते २५० है. सिंचन क्षमता असलेल्या धरणाच्या भिंतीपासून १० मी. अंतरापर्यंत गाळ काढण्यास निर्बंध असतील.
  • ज्या तलावांचे क्षेत्रांची मालकी खाजगी शेतकऱ्यांची असेल किंवा ज्या तलावांच्या मालकीबाबत स्पष्टता नाही तेथील गाळ काढता येणार नाही.

तहसिलदार यांची जबाबदारी-

  • संबंधीत शेतकरी / अशासकीय संस्था यांच्याकडून गाळ काढण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद त्यांनी ठेवावी.
  • संबंधित शेतकरी / संस्था यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाळ काढण्याबाबत संबंधित तलाठी यांनी वेळोवेळी पाहणी करावी.
  • संबंधीत तहसिलदार यांनी असा प्रस्ताव त्यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतीत ४८ तास (२ दिवस) / ३ दिवस या कालावधीत यांना काही कळविले नसल्यास मुदतीनंतर शेतकरी / संस्थेस गाळ काढण्याचे काम सुरु करता येईल.
  • गाळ उत्खनन करतेवेळी शेतकरी / अशासकीय संस्था यांचेकडून गाळाव्यतिरिक्त मुरुम / वाळू याचे उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी. गाळाव्यतिरिक्त मुरुम व वाळुचे उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यास गाळ उत्खननाचे काम तात्काळ बंद करण्यात यावे.
  • ० ते १०० हे. सिंचन क्षमता असलेल्या धरणातील गाळ काढण्यासाठी शासकीय खर्च करु नये.
  • गाळ उत्खननाचे काम सुरु करण्या अगोदरचे व काम पुर्ण झाल्यानंतरचे डिजिटल फोटो ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करण्याची जबाबदारी तहसिलदार यांची राहील.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा.

हि योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती.समितीने दिलेल्या अहवालातील तलावातील गाळ उपसा करून शेतात टाकण्यासाठी ४ वर्षामध्ये हि योजना टप्याटप्याने राबविणे अपेक्षित होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हि योजना बारगळली होती.त्यामुळे आता पुन्हा हि योजना सुरु होत असल्याने तलावातील गाळ काढण्याने पाणी साठा तर वाढणार आहेच.परंतु शेतकरी बांधवाना त्यांच्या खडकाळ जमिनीसाठी गाळ देखील उपलब्ध होणार आहे.

Gal Mukta Dharan Gal Yukta Shivar Farmer Scheme

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

प्रश्न १. काय आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना?

उत्तर : या योजना अंतर्गत लोकसहभागातून शेतकरी बांधवाना तलावातील गाळ उपलब्ध करून दिला जातो.

प्रश्न 2. हि योजना कोणासाठी आहे.अर्ज कोण करू शकतो?

उत्तर : संबंधीत शेतकरी / अशासकीय संस्था हे या योजनेचा अर्ज करू शकतात.

प्रश्न 3. अर्ज कसा व कोठे करावा ?

उत्तर : या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्जाची लिंक या लेखामध्ये दिलेली आहे.

प्रश्न ४. योजनेचे स्वरूप कसे आहे ?

उत्तर : हि योजना लोकसहभागातून राबविली जाते. योजना संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

 

अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या शेती विषयक योजना बघण्यासाठी येथे क्लिक करा.


Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies