Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 861 विद्यार्थ्यांना फेलोशीप ! Fellowship 2023


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 861 विद्यार्थ्यांना फेलोशीप

            राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे पीएचडीसाठी पुढील वर्षापासून दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश नुकतेच प्रशासनास दिले आहेत. 

                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. 

                या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने काल (दि. 12 एप्रिल) सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि  शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली.

            फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य करताच विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दादेखील मांडला आहे. 

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies