Hot Widget

Type Here to Get Search Results !

पॉवर विडर यंत्रासाठी 50 टक्के अनुदान ! Power Weeder Subsidy 2023


पॉवर विडर यंत्रासाठी 50 टक्के अनुदान ! Power Weeder Subsidy 2023
Power Weeder Subsidy 

महाराष्ट्र शासन कृषी विभागा अंतर्गत वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांना दिल्या जातात. ज्याद्वारे शेतकरी या योजनेपासून उत्पन्न वाढीच्या गर्जा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन करत असतो.त्यापैकीच एक योजना कृषी विभागांतर्गत दिली जाते ती म्हणजे कृषी यांत्रिकीकरणांमध्ये आंतरमशागत अवजार पॉवर  विडर या यंत्रास शासनाद्वारे 50% टक्के पर्यंत अनुदान. एससी एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के तर इतर वर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते.

❋ पॉवर विडर यंत्राचा वापर का करावा:-

या यंत्राचा वापर करून शेतकरी आपली आर्थिक उन्नती साधू शकतो.पॉवर विडर कॉम्पॅक्ट आणि हलके वजन मशीन आहेत जी पेट्रोल किंवा डिझेल इंजिनद्वारे चालविली जातात या यंत्राचा मुख्य हेतू धान, ऊस, फळे, भाज्या यासारख्या वेगवेगळ्या शेती, बागायती आणि वृक्षारोपण उत्पादनांमध्ये आंतर-लागवड करणे किंवा डी-वीड करणे होय.

❋ पॉवर विडर वापरण्याचे फायदे :-

✽ पॉवर विडर शेतक-यांना अनेक फायदे पुरवतात.

  1. कॉम्पॅक्ट डिझाईन्समध्ये असल्यामुळे ते कमीत कमी किंमतीत उपलब्ध आहेत.
  2. या द्वारे मानवी प्रयत्नांची आवश्यकता कमी करून कामगार खर्च कमी करता येतो.
  3. वेगवेगळ्या यंत्रांचा देखभाल खर्च कमी करता येतो.
  4. तणनियंत्रणासाठी हानिकारक कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
  5. सोयाबीन, मका आणि हरभरा इत्यादी पिकांसाठी रोटरी लागवड करता येते.

❋ पॉवर विडर अर्ज करावयास लागणारी कागदपत्रे:-

  1. ७/१२ उतारा
  2. ८ अ दाखला
  3. आधार कार्ड
  4. जाती प्रमाणपत्र
  5. समती प्रमाण पत्र
  6. स्वय घोषणा प्रमाण पत्र
  7. खरेदी केल्याचे कोटीशन व टेस्ट रिपोर्ट (लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर)

❋  अर्ज कोठे व कसा करावा:-

  1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन नवीन शेतकरी नोंदणी करून घ्यावे.
  2. नोंदणी झाल्यानंतर आपला वापर करता आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  3. लॉगिन झाल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडावा.
  4. त्यामध्ये ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारामध्ये 35 बी एच पी च्या पुढे हे निवडावे.
  5. नंतर अंतर मशागत अवजारे.
  6. पुढे पावर विडर पाच एचपी च्या पुढे हा पर्याय निवडावा.
  7. नंतर अर्जाचे पेमेंट करून अर्ज सबमिट करावा.

✽  कृषी विभागा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या हया पण योजना!

कडबा कुट्टी योजना 50% पर्यंत अनुदान


या योजनेचा लाभ सर्व शेतकरी मित्रानं पर्यंत पोहोचवा.

अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.


जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा


शासनाच्या शेती विषयक योजना बघण्यासाठी येथे क्लिक करा.



Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies